महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने पाचोऱ्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा आणि क्षेत्रीय किसान गप्पा कार्यक्रम संपन्न
पाचोरा, ता. ६ मे २०२५ – महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथे आज खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा, आढावा सभा आणि क्षेत्रीय किसान गप्पा-गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम खाजगी-सरकारी भागीदारी उपक्रम २०२५–२०२६ अंतर्गत घेण्यात आला असून, त्यात शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, खासगी कंपन्या, सूक्ष्म सिंचन वितरक तसेच निविष्ठा वितरक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील साहेब प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासोबत पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार साहेब, जिल्हा कृषी अधिकारी तडवी साहेब, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी बोरसे साहेब, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील आणि संचालक मंडळातील सुनील आबा पाटील, राहुल पाटील, प्रकाश तांबे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपा उपजिल्हाध्यक्ष मधुकर सुकदेव काटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, विनोद महाजन, हेमंत चव्हाण, प्रविण ब्राम्हणे, सुनील पाटील आणि राजेश पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील नियोजन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तसेच शाश्वत सिंचन पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल व पंचायत समितीचे अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला, आणि विविध शंका समाधान तसेच नवीन माहितीची देवाण-घेवाण झाली. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.