माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपा प्रवेश;

0
8

आरोग्यदूत न्यूज चैनल
दि 27 मे 2025
प्रतिनिधी, रईस बागवान
माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपा प्रवेश; जळगाव जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट पाचोरा – पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून भारतीय जनता पक्षात (भाजपा) मंगळवारी प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला.
या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, विजय चौधरी, राधेश्याम चौधरी आणि प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
दिलीप वाघ यांच्यासोबतच शरद पवार गटाचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग मोरे, रोहन मोरे, नाना महाजन, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, पारोळा बाजार समितीचे संचालक नागराज पाटील, तसेच उबाठा गटाचे शहरप्रमुख सोमनाथ देशमुख यांनीही भाजपा प्रवेश केला. पराग मोरे सध्या जळगाव दूध संघाचे संचालक आहेत.
या प्रसंगी बोलताना श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, “गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपा संघटना वेगाने बळकट होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये सहभागी होत आहेत. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून त्यांना योग्य स्थान दिले जाईल.”या पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्यात आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.