नानिर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या श्रेया महालपुरे यांना विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड,

0
87

 नानिर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या श्रेया महालपुरे यांना विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड, जिल्ह्यात आनंदाचा वातावरण

 

पाचोरा: जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेत गौरवशाली कामगिरी केल्यानंतर निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कु. श्रेया विनोद महालपुरे यांना विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. १७ वर्षे वयोगटात तिने आपल्या कौशल्याने आणि संयमाने सगळ्यांचे लक्ष वेधले असून, आता ती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे सन्मानाने प्रतिनिधित्व करणार आहे.श्रेया याच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील आणि प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी श्रेयाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिला आगामी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री. प्रवीण मोरे व श्री. सोमनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाचे विशेष स्थान आहे. त्यांच्या सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि कष्टांच्या जोरावर श्रेया या उच्च पातळीवर पोहोचली आहे. हे प्रोत्साहन केवळ तिला नाही तर संपूर्ण शाळा परिवाराला प्रेरणा देणारे आहे.श्रेया महालपुरे यांनी केवळ स्वत:साठी नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमान वाढवला असून, तिच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात निर्मल इंटरनॅशनल स्कूलची प्रतिष्ठा अधिक बळकट झाली आहे. आगामी विभागीय कॅरम स्पर्धेत तिच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार असून, हे यश शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.